दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांसोबत ट्रम्प यांची भेट ठरली नाट्यमय   

शेतकर्‍यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून झाला वाद

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान गोर्‍या शेतकर्‍यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत आफ्रिकेचे सरकार हे प्रकरण सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.

रामाफोसा यांच्याकडून आरोपांचे खंडन 

ट्रम्प म्हणाले, दक्षिण आफ्रिकेत गोरे शेतकरी सुरक्षेत नाहीत. ते येथून स्थलांतर करत आहेत. त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. बर्‍याच प्रकरणांमध्ये त्यांना मारले जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, ’आम्ही याचा पूर्णपणे विरोध करतो.’ यानंंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेतील श्वेतवर्णीयांवरील हल्ल्यांच्या दाव्यांवर आधारित व्हिडिओ दाखविल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. 
 
ट्रम्प यांच्या आरोपांनंतर अस्वस्थ झालेले दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष शांत राहिले, ते म्हणाले, की व्हिडिओमध्ये जे काही दाखवले गेले आहे, त्याचे समर्थन आम्ही आणि आमचे सरकार कधीही करणार नाही. व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर रामाफोसा यांनी सांगितले, की बैठक खूप चांगली झाली. यावेळी गोल्फवरही चर्चा झाली. त्यांनी ट्रम्प यांना १४ किलो वजनाचे गोल्फ बुक भेट दिले.
 

Related Articles